आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील शाळकरी मुले संसद बघून गेले हरखून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणजे देशाची संसद. पाठ्यपुस्तकात वाचलेल्या संसदेला प्रत्यक्ष बघून कोणताही शाळकरी मुलगा हरखून जाणार नसेल तरच नवल. सोमवारी महाराष्ट्रातील शाळकरी मुलांनी संसद परिसरात मुक्त भटकंती केली. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना प्रत्यक्षात मिळाली. मराठी मुलांमध्ये भाजप खासदार पूनम महाजनही रमल्या होत्या.
पावसाळी अधिवेशन पाहण्यासाठी दिल्लीतील शालेय मुलेही आली हाेती. त्यांच्यासोबत हास्यमस्करी करताना खासदार जया बच्चन.