आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'व्यर्थ न हो बलिदान\': महाराष्ट्राच्या 742 वीर सुपुत्रांनी दिली प्राणांची आहुती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारताच्या रक्षणासाठी तळहातावर प्राण घेऊन सदैव सज्ज असलेल्या जवानांमुळे तुम्हाला-आम्हाला सुखाने जगता येते. जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये रविवारी सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, परंतु भारताच्या 2 जवानांनाही वीरमरण आले. शहिदांपैकी एक अकोल्याचे सुपुत्र सुमेध गवई होते. शहीद सुमेद गवईंचे अकोल्यातील लोणाग्रा हे गाव आहे.
- वेळोवेळी दहशतवाद्यांशी लढताना, कधी हिमस्खलनासारख्या नैसर्गिक संकटामुळे सीमेचे रक्षण करताना वीर जवानांनी प्राणांची बाजी लावलेली आहे.
 
31 डिसेंबर 2016 पर्यंत महाराष्ट्राचे 742 जवान शहीद
- केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार,  31 डिसेंबर 2016 पर्यंत महाराष्ट्राच्या तब्बल 742 जवान आणि सैन्य अधिकाऱ्यांनी प्राणांची आहुती दिली.
यात लष्करातून 722, नौदलातून 13, तर वायुदलातून 7 वीर जवानांनी प्राणांची आहुती दिली.
मागच्याच महिन्यात, औरंगाबादचे जवान संदीप जाधव, कोल्हापूरचे जवान सावन माने यांना वीरमरण आले होते. रविवारी शोपियांमध्ये दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याचे सुमेध गवई शहीद झाले. दहशतवादाचे मूळ कारण असलेल्या पाकिस्तानचा पक्का बंदोबस्त करण्याची प्रतिक्रिया आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेली आहे. देशासाठी शहीद झाल्याने आम्हाला अभिमान आहे, पण शत्रूचा एकदा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशीच तीव्र प्रतिक्रिया कुटुंबीयांसह सर्व स्तरांतून उमटते आहे. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या शहिदांची माहिती...
बातम्या आणखी आहेत...