आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 3839 किलोमीटर रस्त्यांचे होणार राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील ३, ८३९ किलोमीटर लांबीच्या राज्यरस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा-इंदूर , औरंगाबाद- जळगाव- नाशिक या राज्य रस्त्यांचाही समावेश आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई- नागपूर सहा पदरी हरित महामार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गुरुवारी करारही झाला असून त्यासाठी केंद्र सरकार ३२ हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. सांगोला-पंढरपूर-मोहोळ या १७१ कि.मी. लांबीचा रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग ७५३ अ या विस्तारित योजनेतील मलकापूर-बुलडाणा-चिखली-जालना-औरंगाबाद ते शिर्डीपर्यंतचा २८३ कि.मी. लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. इंदूर- बऱ्हाणपूर-पिपारी-मुक्ताईनगर-बोधवड-जामनेर-पाहूर-अजिंठा-सिल्लोड-औरंगाबाद हा ४०१ कि.मी.लांबीचा रस्ता व औरंगाबाद-जळगाव-नाशिक हा ३३८ कि.मी. लांबीचा रस्ता, नांदेड-हिंगोली-वाशीम-बदलापूर-शेगाव-जळगाव-जामोद-बऱ्हाणपूर-इंदूर या ३०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होत आहे.
बातम्या आणखी आहेत...