आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्टेशनच्या वेटिंगरुमध्ये थांबला होता नथुराम, भुईमुगाच्या शेंगा खाण्याची झाली होती इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीजींच्या पार्थिवाजवळ बसलेले त्यांचे सहकारी - Divya Marathi
गांधीजींच्या पार्थिवाजवळ बसलेले त्यांचे सहकारी
नवी दिल्ली - महात्मा गांधींची आज पुण्यतिथी (30 जानेवारी) आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com महात्मा गांधींच्या जीवनाशी निगडीत अद्याप फार उजेडात न आलेल्या काही गोष्टी सांगत आहे.

30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येच्या एक दिवसआधी नथुराम जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर मित्र नारायण आपटे आणि विष्णू करकरे यांच्यासोबत वेटिंग रुममध्ये एक रात्र मुक्कामी होता. सकाळी उठल्याबरोबर त्याने आपटेला भुईमुगाच्या शेंगा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. नथुरामसाठी भुईमुगाच्या शेंगा शोधत आपटे स्टेशन बाहेर पडला. थोड्यावेळाने तो परत आला मात्र रिकाम्या हाताने.
रिकाम्या हाताने परत आलेला आपटे नथुरामला म्हणाला, 'भुईमुगाच्या शेंगा कुठेही मिळाल्या नाही, पण काजू किंवा बदाम घेऊन येऊ का ?' नथुराम म्हणाला, 'नको, मला शेंगा खाण्याचीच इच्छा झाली होती बाकी काही नको.' त्यावर आपटे पुन्हा वेटिंग रुममधून बाहेर पडला आणि भुईमुगाच्या शेंगा घेऊनच परत आला. नथुराम आनंदी झाला आणि त्याने सर्व शेंगा खाल्ल्या. तेव्हाच आपटे म्हणाला, चला आता निघण्याची वेळ झाली आहे!
टांग्यात बसून गेले बिर्ला हाऊसपर्यंत
नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी साधारण सव्वा चार वाजता रेल्वे स्टेशन सोडले. स्टेशनपासून कॅनॉट प्लेसपर्यंत ते टांग्यात बसून गेले. तेथून त्यांनी परत दुसरा टांगा केला आणि बिर्ला हाऊसच्या थोडे अलिकडेच टांग्यातून उतरले आणि तेथून पायी चालत गेले. इकडे गांधीजींना प्रार्थनासभेला पोहोचण्यासाठी त्या दिवशी 10 मिनिटे उशिर झाला होता. जेव्हा त्यांना आठवण करुन देण्यात आली तेव्हा ते उठले, पायात चप्पल चढवली आणि प्रार्थनास्थळाकडे निघाले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा केला गांधीजींवर हल्ला