आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatami Gandhi's Thoughts Now In Chineses School

चीनमध्ये शालेय अभ्यासक्रमात गांधी विचाराची शिकवण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची महती चीनला कळू लागली आहे. चीनमधील प्राथमिक अभ्यासक्रमापासून महाविद्यालयीन शिक्षणात महात्मा गांधींचे विचार व अहिंसात्मक आंदोलनाचा समावेश करण्यात आला आहे. चिनी लोकांची गांधींच्या विचाराप्रति उत्सुकता वाढली असल्याचे चीनमधील एका मान्यवराने सांगितले.

भारतीय मुत्सद्दी पी.ए. नाजरेथ यांच्या ‘गांधीज आऊटस्टॅँडिंग लीडरशिप’ या पुस्तकाचे प्रो. क्वानयू शांग यांनी भाषांतर केले आहे. चिनीमध्ये विविध स्तरांवरील अभ्यासक्रमात गांधी विचारांचा समावेश करण्यात आला आहे, असे शांग यांनी सांगितले. शांग दक्षिण चिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीत परराष्ट्रविषयक विभागात प्रोफेसर आहेत. भारतीय नेत्यावरील पुस्तकाला चीनमध्ये प्रतिसाद मिळेल काय, या प्रश्नावर शांग म्हणाले, चीनमध्ये गांधीजींवर खूप पुस्तके आली आहेत. नवे पुस्तक नैतिक शिक्षण तसेच नेतृत्वगुणासाठी नवा दृष्टिकोन देणारे ठरेल, असेही शांग यांनी सांगितले.

चित्रकलेल्या रूपात गांधी विचार- सुरुवातीस केवळ चिनी विद्वानांनाच गांधीजी माहीत होते. मात्र आता गांधीजींचे तत्त्वज्ञान व अहिंसात्मक आंदोलनाबद्दल लोकांची उत्सुकता वाढत आहे. प्राथमिक अभ्यासक्रमात गांधीजींचे विचार चित्रकलेच्या माध्यमातून सांगितले जात आहेत. माध्यमिक शाळेत युद्ध इतिहासाचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये गांधीजींच्या अहिंसात्मक आंदोलनाचा समावेश करण्यात आला आहे.