आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत गांधी GIRLS: गांधीजींच्या कुटुंबात मुलांपेक्षा जास्त आहेत मुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महात्मा गांधींबद्दल आपण शाळकरी वयापासून काही ना काही वाचत आलेलो आहोत. सर्वांनाच गांधीजींबद्दल थोडीफार माहिती असते. मात्र त्यांच्या परिवाराबद्दल अनेकांना माहित नाही. गांधी जयंतीच्या निमित्ताने divyamarathi.com सांगत आहे गांधीजींचे वंशज काय करतात.
गांधींजींचे 154 वंशज आज जगातील सहा देशांमध्ये राहात आहेत. यात त्यांचे नातू आणि नात व त्यांच्या मुलांचा समावेश आहे. हे सर्व उच्च विद्याविभूषीत प्राध्यापक, पत्रकार ते शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यातील 12 डॉक्टर, 12 प्राध्यापक, 5 इंजिनिअर, 4 वकील, 3 पत्रकार, 2 आयएएस, 1 शास्त्रज्ञ, 1 चार्टड अकाऊंटंट, 5 खासगी कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि 4 पीएचडी धारक आहेत. त्यांच्या कुटुंबात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. हे सर्व लोक भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे राहातात. विशेष म्हणजे महात्मा गांधींना मुलगी नव्हती, याचे त्यांना कायम शल्य होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...