आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींच्या हत्येआधी नथुराम गोडसेने खाल्ल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधी आणि त्यांच्यावर गोळ्या झाडणारा नथुराम गोडसे - Divya Marathi
महात्मा गांधी आणि त्यांच्यावर गोळ्या झाडणारा नथुराम गोडसे
नवी दिल्ली - महात्मा गांधींची शुक्रवारी (2 ऑक्टोबर) जयंती आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com महात्मा गांधींच्या जीवनाशी निगडीत अद्याप फार उजेडात न आलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. त्यासोबतच नथुराम गोडसेचा दुर्मिळ व्हिडिओ देत आहोत. (व्हिडिओ पाहाण्यासाठी वरील स्लाइडवर क्लिक करा.)

30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येच्या एक दिवसा आधी नथुराम जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर मित्र नारायण आपटे आणि विष्णू करकरे यांच्यासोबत वेटिंग रुममध्ये एक रात्र मुक्कामी होता. सकाळी उठल्याबरोबर त्याने आपटेला भुईमुगाच्या शेंगा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. नथुरामसाठी भुईमुगाच्या शेंगा आणण्यासाठी आपटे स्टेशन बाहेर पडला. थोड्यावेळाने तो परत आला मात्र रिकाम्या हाताने.
परत आल्यानंतर आपटे नथुरामला म्हणाला, भुईमुगाच्या शेंगा कुठेही सापडल्या नाही पण काजू किंवा बदाम घेऊन येऊ का ? नथुरामने सांगितले नको, मला शेंगा खाण्याचीच इच्छा झाली होती बाकी काही नको. त्यावर आपटे पुन्हा वेटिंग रुममधून बाहेर पडला आणि भुईमुगाच्या शेंगा घेऊनच परत आला. नथुराम आनंदी झाला आणि त्याने सर्व शेंगा खाल्ल्या. तेव्हाच आपटे म्हणाला, चला आता निघण्याची वेळ झाली आहे.

टांग्यात बसून गेले बिर्ला हाऊसपर्यंत
नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी साधारण सव्वा चार वाजता रेल्वे स्टेशन सोडले. स्टेशनपासून कॅनॉट प्लेसपर्यंत ते टांग्यात बसून गेले. तेथून त्यांनी परत दुसरा टांगा केला आणि बिर्ला हाऊसच्या थोडे अलिकडेच टांग्यातून उतरले आणि तेथून पायी चालत गेले. इकडे गांधीजींना प्रार्थनासभेला पोहोचण्यासाठी त्या दिवशी 10 मिनिटे उशिर झाला होता. जेव्हा त्यांना आठवण करुन देण्यात आली तेव्हा ते उठले, पायात चप्पल चढवली आणि प्रार्थनास्थळाकडे निघाले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा केला गांधीजींवर हल्ला