आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhis Swadeshi Andolan In Freedom Movement

बापूंच्या या आंदोलनाची लादेन देत होता चेल्यांना शिकवण, विदेशी वस्तूंची केली होती होळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोणत्याही देशाचे राजकारण हे तेथील अर्थिकनीतीवर अवलंबून असते असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे. आर्थिक आघाडीवरच घाला घातला तर देश कमकुवत होतो. काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा अमेरिकेने घरात घूसून ठार केलेला म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या ऑडिओ टेप समोर आल्या आहेत. त्यात त्याने अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा त्याचा हेतू यातून स्पष्ट होतो. त्याच बरोबर महात्मा गांधींच्या 'स्वदेशी आंदोलना'नेही तो प्रेरित असल्याचे यातून दिसून येते.
भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटीशांच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नव्हता असे बोलले जात होते. ब्रिटनची सर्वात मोठी बाजारपेठ भारत होती. त्यावरच महात्मा गांधींनी स्वदेशी आंदोलनाने घाला घालण्याचे काम केले होते. यातून ब्रिटीशांच्या अर्थकारणावर परिणाम झाला त्यासोबतच भारतीयांच्या स्वदेशी रोजगारालाही बळ मिळाले होते.
ओसामाच्या टेपमध्ये काय आहे ?
टेप मध्ये ओसामा म्हणतो, 'ब्रिटनचे उदाहरण पाहा, त्यांच्या बद्दल असे म्हटले जात होते, की त्यांच्या साम्राज्यावर सूर्यास्त होत नाही. मात्र जेव्हा गांधींनी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घातला, तेव्हा ब्रिटनला भारतापुढे माघार घ्यावी लागली. आज आम्हीही अमेरिकेसोबत असेच केले पाहिजे.'

काय होते महात्मा गांधींचे स्वदेशी आंदोलन
इंग्रजांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी 1906 मध्ये स्वदेशी आंदोलन सुरु केले. गांधीजींनी देशातील नागरिकांना ब्रिटनमध्ये तयार झालेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचे आवाहन केले. विदेशातील कपडे, वस्तू, मसाले यांवर बहिष्कार टाकण्यात आला. हे आंदोलन देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सूरु होते. यामुळे स्वातंत्र्य चळवळीला वेगळे बळ मिळाले आणि लोकांमध्ये आत्मसन्मान जागृत झाला. अनेकांनी रेशमी तलम वस्त्रांचा त्याग करुन जाडीभरडी खादी वापरण्यास सुरुवात केली. महात्मा गांधीच्या सर्व आंदोलनामधील हे सर्वात यशस्वी आंदोलन होते. यात लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत आणि गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व सहभागी झाले होते.
स्वदेशी आंदोलनाचा ब्रिटीश सरकारवर परिणाम
बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी आंदोलनाने देशातील कित्येक भागांमध्ये विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. गांधीजींनी जनतेला स्वदेशी वस्तुंचा वापर करण्याचे आवाहन करत आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले होते. बंगाल, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात काँग्रेसी घराघरात जाऊन विदेशी वस्तू एकत्र करुन त्यांची चौकाचौकात होळी करत होते. यामुळे ब्रिटीश सरकारचे कंबरडे मोडले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश इंग्रज सराकरच्या आर्थिक नाड्या आवळणे आणि भारतीय कामगारांना पुन्हा उर्जितावस्था मिळवून देणे हा होता.
ईस्ट इंडिया कंपनीचे मोठे नुकसान
इंग्रजांचे भारतावर राज्य येण्याआधी येथील सुती कापड, जूट, मसाले यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. इंग्रज व्यापर करण्यासाठी सर्वप्रथम भारतात आले. 31 डिसेंबर 1600 मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि भारतातील कच्चा माल कमी किंमतीत खरेदी करुन ब्रिटीश सरकारच्या कंपनीत त्याचा पक्का माल तयार करु लागले. त्याला विदेशात निर्यात करण्याबरोबरत भारतीय बाजारातही विक्री केली जाऊ लागली. इंग्रजांच्या या धोरणामुळे भारतातील लघु आणि कुटीर उद्योग हळहळु मरणासन्न अवस्थेत जाऊन पोहोचले. गांधीजींच्या आंदोलनामुळे इंग्रज सरकारला भारतातून मिळाणाऱ्या उत्तपन्नात मोठी घट झाली आणि भारतीय उद्योगाला संजीवनी मिळाली.

पुढील स्लाइडमध्ये, बंकिमचंद्रांनी दिली होती सर्वप्रथम स्वदेशीची घोषणा