आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma\'s Grandson Rajmohan Gandhi Joins AAP, May Contest From Delhi

नरेंद्र मोदी Vs महात्मा गांधींचे नातू; \'आप\'तर्फे राजमोहन गांधींना उमेदवारी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी विरूद्ध राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी असे चित्र दिसण्याची शक्यता आहे. राजमोहन गांधी यांना मोंदीविरुद्ध उमेदवारी देण्याबाबत आम आदमी पक्षाने तयारी सुरु आहे. 78 वर्षीय राजमोहन गांधी यांनी आज (शुक्रवारी) 'आप'मध्ये प्रवेश केला. राजमोहन गांधी हे महात्मा गांधींचा थोरला मुलगा देवदास गांधी यांचे पुत्र आहे.

राजमोहन गांधी हे प्रसिद्ध लेखक आहेत. अमेठीतून राजमोहन यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. यामुळे राजमोहन गांधी यांना 'आप'ने उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी कुठून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप निश्चित झालेले नाही.

राजमोहन गांधी म्हणाले, निवडणूक लढण्याची इच्छा आहे परंतु याबाबत सर्व निर्णय पक्षाने घ्यायचे आहे. त्यांचा आवडता मतदार क्षेत्र कोणते असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगण्यास स्पष्ट नकार दिला. देशात श्रीमंत आणि गरीब जनतेत मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी केवळ भ्रष्टाचार वाढल्यामुळे निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारा विरुद्ध लढा सुरु केल्यामुळे पक्षात प्रवेश केल्याचे गांधी यांनी सांगितले.