आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीत मोठा घातपाताचा कट उधळला आहे. जामा मशिदीजवळ एका ठिकाणी छापा मारून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहे. दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून ते नेपाळमार्गे भारतात आल्याची माहिती आहे. परंतु, आणखी 6 दहशतवादी दिल्लीत लपले आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
दिल्लीत मोठा घातपात घडविण्याची योजना असल्याचा अलर्ट दिल्ली पोलिसांना मिळाला होता. काही दहशतवादी दिल्लीत शिरल्याचेही कळले होते. त्यानंतर बंदोबस्त वाढविण्यात आला होता. जामा मशिद परिसरात एका गेस्ट हाऊसवर भल्या पहाटे छापा मारण्यात आला. खोली क्रमांक 304 मध्ये दोन दहशतवादी थांबले होते. त्यांच्याकडून एके-47 रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली. दिल्लीत मोठे स्फोट घडविण्यास सक्षम असलेली ही स्फोटके आहेत.
गोरखपूर येथून हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी लियाकत शाहला अटक करण्यात आली होता. त्याला पोलिसांनी दिल्लीत आणले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.