आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Fire At Delhi Chandni Chowk News In Marathi

दिल्लीच्या चांदणी चौकात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 25 गाड्या रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चांदणी चौकातील किनारी बाजार परिसरात आज (सोमवार) भीषण आग लागली होती. यात कुणीही मृत्युमुखी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 25 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी जाण्यात समस्या निर्माण होत होत्या.
यासंदर्भात दिल्ली फायर सेवेचे संचालक ए. के. शर्मा म्हणाले, की सुरवातीला ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याचे समजले होते. परंतु, त्यानंतर आग पसरत गेली. आग मीडिअम कॅटेगरीची होती. यामुळे घटनास्थळी 25 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. पण या परिसरातील गल्ल्या फारच अरुंद आहेत. घटनास्थळी जाण्यात गाड्यांना अनेक समस्या येत होत्या.
आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.