आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुवनेश्वरमध्ये रुग्णालयातील अायसीयूमध्ये भीषण अाग; 30 रुग्णांचा हाेरपळून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. - Divya Marathi
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भुवनेश्वर/नवी दिल्ली - ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील सर्वांत मोठ्या सम हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्डात सोमवारी लागलेल्या आगीत ३० रुग्णांचा मृत्यू झाला.
काही रुग्णांचा गुदमरल्याने तर काहींचा होरपळून मृत्यू झाला. १०० हून अधिक जखमी आहेत. २० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चार मजली या रुग्णालयात १२०० खाटा आहेत. आग लागली तेव्हा ५०० रुग्ण दाखल होते. पहिल्या मजल्यावरील डायलिसिस वॉर्डला अगोदर आगीने घेरले. पाहता पाहता ही आग इतर वॉर्डात पसरली. रात्री साडेनऊ वाजता ही आग आटोक्यात आली. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आजारी पित्याला सोडून मारली उडी : ज्योती बेहरांनी सांगितले, मी पहिल्या मजल्यावर होतो. माझे वडील तेथे दाखल आहेत. आगीमुळे सर्वत्र धूर झाला. मी वडिलांना वाचवू पाहत होतो. त्यांना मी खांद्यावर घेतले, परंतु कुणाचा तरी धक्का लागल्याने मी पडलो. नंतर माझा श्वास गुदरमल्याने मी पित्याचा शोध घेऊ शकलो नाही. पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन मी माझा जीव वाचवला. आजारी िपत्याचे काय झाले हे अजून माहीत नाही.

रुग्णालयाचा दावा; सर्व रुग्णांना सुरक्षित काढले : या दुर्घटनेनंतर ६० हून अधिक रुग्णवाहिकांनी रुग्ण जखमींना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. सर्वच रुग्णांना सुरक्षित बाहेर काढले असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

सर्वांत मोठे रुग्णालय :
{सायंकाळी ६.५५ वा. डायलिसिस वॉर्डात झाले शॉर्ट सर्किट.
{ पहिल्या मजल्यावर आयसीयूसह सर्व वॉर्ड पेटले.
{अनेक रुग्णांनी बाल्कनीतून उड्या मारल्या.
{आगीत गुदमरून बहुतांश रुग्णांचा झाला मृत्यू.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आगीची भीषणता...
बातम्या आणखी आहेत...