नवी दिल्ली - देशातील अनेक मोठ्या नद्यांचे पाणी पिण्याच्या लायकीचे नाही. हा खुलासा टेरीने (द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) केलेल्या एका देशव्यापी सर्वेक्षणातून झाला आहे. यात ८६ टक्के लोकांनी या नद्यांमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
टेरीने वाराणसीमध्ये गंगा, दिल्लीत यमुना, जबलपूरमध्ये नर्मदा, कटकमध्ये महानदी, सुरतममध्ये तापी, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा, विजयवाडामध्ये कृष्णा नद्यांच्या पाण्याचे सर्वेक्षण केले. शुक्रवारी जागतिक पर्यावरण िदवस साजरा होत त्यानिमित्त हा अहवाल जारी केला आहे. या सर्वेक्षणात ९३ टक्के लोकांनी नद्यांच्या दुरवस्थेसाठी मल:निस्सारण यंत्रणेला दोषी धरले आहे. नाल्या, कारखाने व नागरी वसाहतीमधील घाण पाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळेच हे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. हे दूषित पाणी त्यावर प्रक्रिया केल्याशिवाय नद्यांत सोडले जाऊ नये, असे मत लोकांनी व्यक्त केले.
अशी आहे परिस्थिती
>उद्योगांमुळे भारतातील ७० टक्के नद्यांचे पाणी दूषित
>भारतात पोटाचे ८० टक्के आजार व समस्या दूषित पाण्यामुळे होत आहेत.
>संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाण्याची गुणवत्ता व उपलब्धतेच्या आधारे भारत जगात १२० व्या स्थानावर
>कानपूरमध्ये १५१ चमडा कारखाने दररोज ५८ लाख लिटर दूषित पाणी गंगा नदीत.
>संयुक्त राष्ट्रसंघानुसार १० पैकी एका व्यक्तीला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही देशांमध्ये १५ कोटी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू शकत नाही.