आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव-कारवार सीमा भाग केंद्रशासित करा, लाेकसभेत शिवसेनेने केली मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेली ५६ वर्षे बेळगाव-कारवार येथील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून छळ करण्यात येत अाहे. हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित अाहे. मात्र, निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी लाेकसभेत केली.

अनेक वर्षांपासून रेंगाळलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न शून्य प्रहरामध्ये खा. राऊत यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी पूर्वपरवानगी घेऊन मराठीतच या विषयाकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद सुटण्यासाठी शिवसेना अाधीपासूनच हा प्रश्न लावून धरत अाहे. राऊत म्हणाले, बेळगाव-कारवार अाणि मराठी भाषिक बहुल असलेल्या भागात मराठी लाेकांवर कानडी लाेकांकडून सातत्याने अन्याय केला जाताे. प्रशासनाकडूनही छळ हाेत असताे. हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात अाहे. मात्र, निर्णय येर्इस्ताेवर हा भाग केंद्रशासीत प्रदेश म्हणून घाेषित करण्याची अाणि मराठी लाेकांवर हाेणारा अन्याय थांबविण्याची मागणी खा. विनायक राऊत यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...