आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दुसऱ्या देशात जाऊन याचना करू नका !\', नरेंद्र मोदींना केजरीवालांचा सल्‍ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केजरीवाल यांनी केलेल ट्वीट - Divya Marathi
केजरीवाल यांनी केलेल ट्वीट
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात जगातील टॉप कंपन्‍यांचे सीईओ यांची भेट घेऊन 'मेक इन इंडिया'साठी भारतात गुंतवणूक करण्‍याबाबत चर्चा केली. दरम्‍यान, हा मुद्दा पकडून दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वटरवरून मोदी यांच्‍यावर कडाडून टीका केली. केजरिवाल म्‍हणाले, ''दुसऱ्या देशात जाऊन याचना करण्यापेक्षा आपण आपल्या बळावर 'मेक इंडिया' बनवायला हवा. त्यानंतर भांडवलदार स्वत:हून गुंतवणूक करतील. शिक्षण, आरोग, इंफ्रास्ट्रक्चर यावर लक्ष द्यायला हवे,'' असेही त्‍यांनी सूचवले. दरम्‍यान, त्‍यांच्‍या या ट्वीटवर भाजपचे प्रवक्‍ते संबित पात्रा म्‍हणाले, ''केजरीवाल यांनी मेक इंडियासाठी चिंता करण्‍यापेक्षा मेक इन दिल्‍लीवर लक्ष द्यावे'', अशी कोटी त्‍यांनी केली.

केजरीवाल यांनी नेमके काय म्‍हटले ?
केजरीवाल यांनी दोन ट्वीट करून मोदी यांच्‍यावर टीका केली. त्‍यांनी म्‍हटले, ''आपण आपल्‍या बळावर 'मेक इंडिया' केला तर आपोआपच 'मेक इन इंडिया' होईल. अनेक मित्र मला विचारतात मेक इंडियाचा अर्थ काय ? आरोग्‍य, शिक्षण, स्‍वच्‍छ आणि मुबलक पाणी, सुरक्षा, इनफ्रास्ट्रक्चरमध्‍ये गुंतवणूक हे सारे म्‍हणजे मेक इंडियाच आहे. भारताचे नागरिकच आपली सर्वांत मोठी संपत्‍ती आहेत. त्‍यांच्‍यामध्‍येच गुंतवणूक करायला हवी. तसे केल्‍यास जग आपल्‍याला फॉलो करेल'', असे त्‍यांनी म्‍हटले. दुसऱ्या ट्वीटमध्‍ये त्‍यांनी म्‍हटले, '' आम आदमी सरकारने दिल्‍लीत प्रो पीपल पावर पॉलिसी बनवून मेक इंडियाच्‍या दिशेने आगेकुच केली आहे. आतापर्यंत वीजपुरवठा असलेल्‍या शंकेला आमच्‍या पारदर्शक सरकारने समाप्‍त केले आहे.
लालू यांचाही मोदींवर टीका
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे. त्‍यांनी म्‍हटले, ‘‘बिहारमध्‍ये भाजपला मुख्‍यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही. त्‍यामुळे NRI उमेदवार शोधण्‍यासाठी मोदी अमेरिकेत गेले आहेत,’’ अशा शब्‍दांत त्‍यांनी टीका केली.