आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make In India Most Important Initiative By Pm Shahrukh Khan

शाहरुखच्या तोंडून Make in India चे कौतूक, मोदींच्या या प्रोग्रामध्ये येणार तिन्ही खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई - असहिष्णुतेच्या मुद्यावर बोलून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहयोगी संघटानांची नाराजी ओढवून घेतलेल्या शाहरुख खानने मोदी सरकारची प्रथमच स्तुती केली केली आहे. त्याने सरकारच्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला देशाच्या विकासासाठीचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या प्रोग्राममुळे देशात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असेही त्याने सांगितले. त्यासोबत 26 मे रोजी मोदी सरकारच्या कामांचा आढावा घेणाऱ्या 'जरा मुस्कुरा दो' या कार्यक्रमात आमिर, सलमानसोबत शाहरुख खानही दिसण्याची शक्यता आहे.
- शाहरुखने बुधवारी मुंबईत भाजप नेत्या शायना एनसी यांच्या मूव्हर्स अँड मेकर्स या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.
- यावेळी तो म्हणाला, 'मेक इन इंडिया आपल्या पंतप्रधानांचे महत्त्वाचे काम आहे. याद्वारे विदेशी कंपन्यांना आपल्या देशात उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जाते.यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होऊ शकते.'
- 'मेक इन इंडियाच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे सुरु होणारे उद्योग अनेक पिढ्यांसाठी फायदेशिर ठरतील.'
- 'ही माझ्यासाठी नव्या युगाची सुरुवात असल्याचे मी मानतो.'
'जरा मुस्कुरा दो' मध्ये तिन्ही खान येणार एकत्र
- केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमीत्त केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित 'जरा मुस्कुरा दो' या कार्यक्रमाचे निमंत्रण बॉलिवूडच्या तिन्ही खानांना गेले आहे.
- हा कार्यक्रम 26 मे रोजी इंडिया गेट येथे होणार असून त्यात साठ हजार लोक सहभाघी होण्याची शक्यता आहे.
- यात दोन वर्षांच्या काळात मोदी सरकारने केलेल्या चांगल्या कामांवर आधारित शॉर्ट फिल्म दाखवली जाईल.
- सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होईल.
- यात सर्व क्षेत्रांसोबत बॉलिवूडमधील दिग्गजांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात ए.आर. रहमान, अजय देवगण, रितेश देशमुख, राजकुमार हिरानी यांच्यासारख्यांचा समावेश आहे.
असहिष्णुतेवर काय म्हणाला होता शाहरुख
>> शाहरुखने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमीत्त एका चॅनलसोबतच्या कार्यक्रमात देशात असहिष्णुता वाढल्याचे म्हटले होते.
>> याच कार्यक्रमादरम्यान शाहरुख म्हणाला होता, 'कोणताही देशभक्त धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात जाऊन चूक करतो.'
>> पुरस्कार वापसीवर शाहरुखने होकार भरला होता. तो म्हणाला होता, 'प्रतिकात्मक रित्या मी देखिल पुरस्कार परत करु शकतो. कारण देशात कट्टरता वाढली आहे.'
>> शाहरुखला भारतात मुस्लिम म्हणून जीवन जगत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला होता, 'माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याची कोणातही हिम्मत नाही, आणि तसा प्रयत्नही कोणी करु शकत नाही.'

शाहरुखच्या वक्तव्याचा काय होता संदर्भ
>> गोमांस असल्याच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील दादरीमध्ये एका व्यक्तीची ठेचून हत्या करण्यात आली होती. कन्नड लेखक डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ साहित्यिकांनी पुरस्कार परत केले होते. त्याआधी महाराष्ट्रात कॉम्रेड पानसरेंचा खून करण्यात आला होता.
>> या निषेधार्थ 40 हून अधिक साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केले होते.
>> 13 इतिहासकार आणि काही शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय पुरस्कार परत केले होते.
>> दिबाकर बॅनर्जींसारख्या 10 चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे पुरस्कार परत केले होते.
>> प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमींनी म्हटले होते, देशात इन्टॉलरेंस वाढला आहे. आपल्या सर्वांना प्रतिकात्मक रित्या आपले पुरस्कार परत केले पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा VIDEO, काय म्हणाला शाहरुख