आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोक-यात अच्छे दिन लवकरच, मेक इन इंडियाचे परिणाम आगामी तिमाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजना "मेक इन इंडिया' आणि "स्किल इंडिया'वर विश्वास ठेवत रोजगार निर्मिती क्षेत्रात अच्छे दिन लवकरच येतील, असा दावा मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. मात्र, त्यासाठी आणखी बारा - अठरा अाठवड्यांची कळ सोसावी लागणार आहे.

कामगार विभागाने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात रोजगार निर्मितीमध्ये काहीशी घसरण आल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचबरोबर उत्पादन, पायाभूत सुविधा आणि खाण क्षेत्रातील आश्वासक विकासामुळे रोजगार निर्मितीत आशादायक चित्र तयार झाले आहे. धोरणात्मक निर्णय पाहता रोजगार निर्मिती अद्यापही स्वप्नवत वाटत आहे. रोजगारातील दृश्य परिणाम जाणवण्यासाठी आणखी १२-१८ आठवड्यांचा अवधी लागेल,असे अँटल इंटरनॅशनल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जोसेफ देवसिया यांनी सांगितले.

कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती
देशात कुशल मनुष्यबळाचा अभाव हे मोठे आव्हान आहे. तरुण लोकसंख्येला प्रशिक्षित करण्यासाठी सरकार व उद्योगांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तरुणांच्या कौशल्य विकास आणि शिक्षणावर प्रामुख्याने भर दिल्यास भविष्यात रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे हीरो माइंडमाइनचे सीईओ संदीप सोनी यांनी सांगितले. मॅनपॉवर ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणात ५८ टक्के भारतीय नियोक्ते योग्य उमेदवार मिळत नसल्याने असमाधानी आहेत.

सुधारणेचा ट्रेंड कायम राहणार
बेरोजगार मनुष्यबळाचा वापर आणि कौशल्य विकासावर सरकारने भर देणे आवश्यक असल्याचे मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष श्रीकांत रंगराजन यांनी सांगितले. सरकारने घेतलेल्या निर्णयातून येत्या काही दिवसांत रोजगारामध्ये आशादायक चित्र निर्माण होईल. देशांतर्गत बाजारपेठतील मागणीनुसार आगामी तिमाहीत रोजगारामध्ये झपाट्याने वाढ होईल, असे नोकरीशी संबंधित पोर्टल विस्डम जॉब्जच्या पाहणीत म्हटले आहे. गेल्या तिमाहीत विविध क्षेत्रांमध्ये मेक इंडिया मोहिमेचे दृश्य परिणाम जाणवले. आगामी तिमाहीमध्येही हाचच ट्रेंड राहील, असे विस्डम जॉब्जचे सीईओ अजय कोला म्हणाले.

आश्वासनपूर्तता निश्चित होईल
^केंद्राच्या मेक इन इंडिया धोरणाला उद्योग जगताकडून अपेक्षित पाठिंबा मिळतो की नाही, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. मात्र, सरकारची आश्वासनपूर्ती निश्चित होईल अशी आम्हाला आशा आहे.
विजय देशपांडे, एचआर प्रमुख, जेके टायर्स अँड इंडस्ट्रीज
बातम्या आणखी आहेत...