आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Milk Adulteration Punishable With Life Imprisonment: SC

'कायद्यात जन्मठेपेची तरतूद करा', दुध भेसळ प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे कडक निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुध भेसळ करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा केली जाईल अशी कायद्यात तरतूद करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दुध उत्पादन आणि विक्री कायद्यात बदल करण्यास राज्य सरकारांना सांगितले आहे.
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये दुध भेसळीचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी दाखल एका जनहित याचिकेवर न्या. ए.के.सिक्री आणि न्या. के.एस.राधाकृष्णन यांच्या पीठाने हे निर्देश दिले आहेत.
थोड्याशा फायद्यासाठी काही लोक दुधात अपायकारक औषधींची भेसळ करुन लाखो लोकांच्या जीविताला धोका निर्माण करतात. त्यांना जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद सध्याच्या कायद्यात आहे. मात्र त्यांनी केलेला गुन्हा हा त्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे या कायद्यात बदल करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली.