आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टर्किश विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिग, बॉम्बची सूचना खोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टर्किश विमानाची तपासणी करताना सुरक्षा कर्मचारी - Divya Marathi
टर्किश विमानाची तपासणी करताना सुरक्षा कर्मचारी
नवी दिल्ली - विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाळ्यानंतर टर्किश एअरलाइन्सच्या विमानाचे दिल्ली विमानतळावर तातडीने लँडिग करण्यात आले. हे विमान बँकॉकहून इस्तंबूलला जात होते. वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत (एटीसी) संपर्क करुन सांगितले, की बाथरुमच्या आरशावर लिहिलेले आहे, की कार्गोमध्ये बॉम्ब आहे. एटीसी नागपूरने विमानाला दिल्ली विमानतळाकडे पाठवले. येथे विमान लँड झाल्यानंतर 150 प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमानाला निर्जनस्थळी नेऊन त्याची तपासणी करण्यात आली. मात्र विमानात संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. बॉम्बची निव्वळ अफवा होती.
दरम्यान, फायर ब्रिगेडचे बंब, नॅशनल सेक्युरिटी गार्डस आणि श्वान पथक विमानाकडे तातडीने रवाना करण्यात आले होते. गृहमंत्र्यांनी परिस्थितीची माहिती घेतली होती. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.