भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मानवी हक्कासाठी लढणारी यूसुफझाई मलाला यांना शांततेसाठी देण्यात येणा-या नोबेल पुरस्काराने आज (बुधवारी) सन्मानीत करण्यात येत आहे.
बालमजूरी विरोधात केलेल्या कार्याबद्दल सत्यर्थी यांना नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे तर तालिबान्यांविरोधात लढा देणारी पाकिस्तानाची रणरागिणी मलाला युसुफझाईने पाकिस्तानी मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केलेला लढ्याबद्दल तिला पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. यावर्षीचे नोबल सत्यर्थी आणि मलाला यांना विभागून देण्यात येत आहे.
काय म्हणाले सत्यार्थी-
यावेळी सत्यर्थी म्हणाले की शांततेसाठी देणात येणारा पुरस्कार मलाला सोबत मिळत आहे. यामुळे मी आज खरोखर आनंदात आहे. एवढ्या कमी वयात मानवी हक्कासाठी आणि तालिबान्यांविरोधात लढणा-या मलाला सोबत हा पुरस्कार मला मिळत आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आज मला आणखी एक मुलगी मिळाली आहे. आम्ही दोघे मिळून जगभरातील बालमजूरी थांबवण्याबरोबरच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू.
मला मिळाली वडील-
सत्यर्थी यांच्याकडे इशारा करत मलाही या पुरस्काराबरोबर एक वडील मिळाले असल्याचे मलालाने सांगितले. आज वडीलांसोबत बसून हा पुरस्कार स्वीकारणार असल्यामुळे आज मी खरोखर आनंदी झाले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा या शांतिदूतांची छायाचित्रे...