आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Malegaon Blast: A Notice To The State Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालेगाव स्‍फोट : सालियान यांना हटवल्याने सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारला विचारला जाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी साध्‍वी प्रज्ञा ठाकूर - Divya Marathi
आरोपी साध्‍वी प्रज्ञा ठाकूर
नवी दिल्ली - मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यातून सरकारी वकील रोहिणी सालियान यांना हटवण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) नोटीस जारी करून उत्तर मागवले आहे.

या प्रकरणी नरमाईची भूमिका घ्यावी यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकला होता, असा आरोप सालियान यांनी केला होता. हर्ष मंदर या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पीडितांना न्याय मिळावा, यासाठी एनआयएच्या न्यायालयात सरकारच्या बाजूने युक्तिवादासाठी नामांकित वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. त्यावर सर्व संबंधितांनी आठवडाभरात उत्तर द्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.

या खटल्यात लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ११ आरोपी आहेत. चार हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट मुस्लिमबहुल भागाला लक्ष्य करून घडवण्यात आला आहे, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटात ४ जण ठार झाले होते, तर ८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...