आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्याचा राग आला उफाळून म्हणाला, मला येत नाही देशाची आठवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला दोषी ठरविण्यात आलेले आहे. - Divya Marathi
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला दोषी ठरविण्यात आलेले आहे.
नवी दिल्ली - बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये घेऊन पळून गेलेला व्यावसायिक विजय मल्ल्याच्या विरोधातील अवमान खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला नाही. मल्ल्याचे प्रत्यर्पण केल्यानंतर सरकार जेव्हा त्याला न्यायालयात हजर करेल तेव्हाच त्याला शिक्षा सुनावली जाईल, असे न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल आणि न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने शुक्रवारी स्पष्ट केले.
 
मल्ल्याच्या अवमान प्रकरणात निकाल टाळावा, असा आग्रह महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी न्यायालयाकडे धरला. ते म्हणाले की, “सरकार मल्ल्याला भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यर्पण प्रक्रिया ४ डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. आरोपीच्या अनुपस्थितीत शिक्षा सुनावणे योग्य ठरणार नाही. प्रत्यर्पण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने निकाल देणे टाळावे.” न्यायालयाने हा युक्तिवाद मंजूर केला. 
 
विजय मल्ल्याने आपल्या संपत्तीचे संपूर्ण विवरण न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने ९ मे रोजी त्याला अवमान प्रकरणात दोषी ठरवले होते. त्याला किती शिक्षा होणार हे शुक्रवारी निश्चित होणार होते.
 
आठ‌वण यावी असे भारतात काही नाही : विजय मल्ल्या
ब्रिटनच्या सिल्व्हरस्टोनमध्ये फाॅर्म्युला वनच्या एका इव्हेंटमध्ये मल्ल्याला विचारण्यात आले-तुम्हाला भारताची आठवण येते का? त्यावर मल्ल्या म्हणाला-आठ‌वण यावी, असे भारतात  काही नाही. माझे कुटुंबीय इंग्लंड किंवा अमेरिकेत आहेत. भारतात कोणीच नाही. माझे सर्व सावत्र भाऊ-बहीण ब्रिटिश नागरिक आहेत. कौटुंबिकदृष्ट्या काहीही आठ‌वणीत ठेवण्याजोगे नाही. तसेही मला लंडनचे वातावरण खूप आवडत आहे. रोज पाहुण्यांना भेटतो आणि मजा करतो. आपल्या कष्टाच्या फळाचा आनंद घेत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...