आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamata Banerjee About News In Marathi, Trunmul Congress

तृणमूल खासदारांची शपथ लटकणार; मोदींवरील रागापोटी ममतांचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी 25 व 26 मे रोजी शपथ घेऊ नये, असे आदेश ममता बॅनर्जी यांनी बजावले आहेत. ही कृती निवडणूक प्रचार काळातील शाब्दिक युद्धानंतर नरेंद्र मोदी यांच्या रागातून करण्यात आली असावी, असे म्हटले जाते.

ममतांच्या आदेशामुळे तृणमूलचे खासदार आता जूनच्या सुरुवातीला शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते. अगोदर आपले खासदार 24 मे रोजी दिल्लीला रवाना होतील. त्यानंतर ते 25 व 26 मे रोजी शपथविधी समारंभात हजर राहतील, असे स्पष्ट केले होते. परंतु गुरुवारी त्यांनी अशा प्रकारे घूमजाव केला. 26 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या समारंभाला तृणमूलचे खासदार हजर राहतील का, याबद्दलही शंका निर्माण झाली आहे. तृणमूलकडून या मुद्द्यावर अद्याप काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. निवडणुकीच्या प्रचार काळात मोदी-ममता यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.

पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा
पंजाबचे पर्यटन-सांस्कृतिक विभागाचे कॅबिनेट मंत्री सारवनसिंग फिलौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात कुटुंबातील सदस्यावर ठपका आल्यानंतर सारवन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून हा निर्णय घेतला. सारवन यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याकडे सोपवला.