आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प. बंगालमधील कॉलेजांमध्ये मोदींच्या भाषणाच्या प्रसारणावर ममतांची बंदी, BJP म्हणाले - दुर्दैवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूजीसीने मोदींच्या भाषणाचे थेट प्रसारण करण्याचे आदेश विद्यापीठ आणि महाविद्यालयांना दिले आहे. (फाइल) - Divya Marathi
यूजीसीने मोदींच्या भाषणाचे थेट प्रसारण करण्याचे आदेश विद्यापीठ आणि महाविद्यालयांना दिले आहे. (फाइल)
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी देशातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करणार आहेत. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) थेट प्रक्षेपणाचे आदेश दिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना म्हटले आहे की हे भाषण ऐकण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्याची गरज नाही. भाजपने यावरुन तृणमूल सरकारवर टीका केली आहे. 
 
राज्य सरकारचा निर्णय आश्चर्यकारक 
- भाजप प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, 'ममता बॅनर्जी सरकारने घेतलेली भूमिका दुर्दैवी आणि आश्चर्यकारक आहे. संघराज्य व्यवस्थेत पंतप्रधान हे सर्वोच्च असतात. केंद्र सरकारचा आदेश नाकारण्याचा एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो का?' असा सवालही कोहलींनी केला आहे. 
- कोहली म्हणाले, 'तुम्हाल पश्चिम बंगालच्या जनतेने निवडले आहे. तुमचे वर्तन मात्र लोकशाहीला धरून नाही.'
- दुसरीकडे भाजप नेते सुदेश वर्मा म्हणाले, पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय मुर्खपणाचा आहे. ते म्हणाले, 'स्वामी विवेकानंदांच्या संबंधीचा कार्यक्रम राष्ट्रभक्तीला प्रोत्साहन देणारा असेल. अशावेळी पंतप्रधानांच्या भाषणाचे प्रसारण रोखणे योग्य नाही.'
 
काय आहे कार्यक्रम?
- स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील धर्म संसदेत दिलेल्या भाषणाला 125 वर्षे होत आहेत आणि पंडित दीनदयाल उपाध्याय शताब्दी महोत्सव या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 'Young lndia, New lndia- A Resurgent Nation: from Sankalp to Sidhhi' या विषयावर देशातील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. 
- यासाठी यूजीसीने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये भाषणाचे थेट प्रसारण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात म्हटल्यानुसार, 11 सप्टेंबर रोजी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोदींचे 'यंग इंडिया-न्यू इंडिया'वरील भाषण नक्की ऐकावे. महाविद्यालयांनी थेट प्रक्षेपणासाठीची सर्व तयारी करण्याचे आदेशात म्हटले आहे. 
- सर्व विद्यार्थ्यांना हे भाषण एकता यावे यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक लिंक जारी केली आहे. येथे या भाषणाचे थेट प्रसारण एकता येणार आहे. 
 
आदेश मानण्यास ममतांचा नकार 
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा आदेश मानण्यास सपशेल नकार दिला आहे. 
- मनुष्यबळ विकासमंत्रालयाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी सरकारने पश्चिम बंगालमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना यूजीसीच्या आदेशाचे पालन करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. 
बातम्या आणखी आहेत...