आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उतरवले दीपा दासमुन्शींना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांच्या पत्नी दीपा यांना उतरवले आहे.

भाजपने या मतदारसंघातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रबोस यांना तिकीट देण्याचा निर्णय अगोदरच जाहीर केला आहे. काँग्रेसने पश्चिम बंगालसाठी शुक्रवारी ४२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाने अगोदर ४३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. राज्याच्या २९४ जागांवर विधानसभेसाठी सहा टप्प्यांत निवडणूक होणार आहे.

काँग्रेस १०० हून अधिक जागांवर उमेदवार उतरवणार नसल्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. उर्वरित जागांवर मित्रपक्ष डावे उमेदवार असतील. लोकसभा निवडणुकीत दीपा दासमुन्शी माकपचे मोहंमद सलीम यांच्याकडून १६०० मतांनी पराभूत झाल्या होत्या. त्या निवडणुकीत दीपा दासमुन्शी यांचे दीर सत्यरंजन यांना मैदान उतरवले होते.
गोगोईंसह अनेक तगड्या उमेदवारांचे अर्ज
आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री तरुण गोगोई, माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल महंत आणि खासदार कामाख्या तासांसह अनेक तगड्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्यात सातत्याने चौथ्यांदा संधी मिळावी, या उद्देशाने गोगोई यांनी तिताबोर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यूपीत भाजपसोबत आघाडी : आठवले
जौनपूर | उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपसोबत आघाडी करेल, असे पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभेचे सदस्य रामदास आठवले यांनी म्हटले आहे. भारत भीम यात्रेदरम्यान जौनपूरमध्ये त्यांनी ही घोषणा केली. भाजपसोबत आघाडी झाली नाही तर पक्ष २०० ते २५० जागा लढवेल.
बातम्या आणखी आहेत...