आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता दीदींच्या प्रचार सभांना ‘डिस्को डान्सर’चा तडका!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती तृणमूल कॉँग्रेसच्या प्रचार मोहिमेत सहभागी होणार असल्यामुळे बंगालमधील निवडणूक रंगतदार होणार आहे. बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये बॉलीवूड अभिनेत्रींच्या सहभागामुळे याआधीच ग्लॅमर प्राप्त झाले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांची तृणमूल कॉँग्रेसच्या तिकिटावर नुकतीच राज्यसभेवर निवड झाली आहे. तृणमूल कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी 12 मार्च रोजी रामलीला मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मिथुन सहभागी होणार आहे. मिथुनदा पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यातील तृणमूल कॉँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. पक्षाने झारखंड, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतील उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल.

जुन्या पिढीतील अभिनेत्री मुनमुन सेन, संध्या रॉय आणि स्थानिक कलाकार देब हे चित्रपटसृष्टीशी संबंधित काही नवे चेहरे आहेत. मिथुनने याआधी निवडणूक प्रचार केला आहे. माकपचे नेते, मागील सरकारमधील क्रीडामंत्री सुभास करोटी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मिथुनने करोटी यांच्या पत्नीचा प्रचार केला होता.

दीदींची अनुपस्थिती
रामलीला मैदानावरील सभेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ममता बॅनर्जी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रचार काळात ममता बॅनर्जी यांच्या गैरहजेरीत अण्णा सभेला संबोधीत करतील. अण्णांच्या या सभेत मिथुन त्यांच्या सोबत असतील. बंगालमधील 42 पैकी सहा मतदारसंघात तृणमूल कॉँग्रेसने चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. यामध्ये विद्यमान खासदार तपस पाल आणि सताबडी रॉय यांचा समावेश आहे.