आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamta Banerjee News In Marathi, Third Frant, Lok Sabha

‘थर्ड फ्रंट’ थकलेल्या नेत्यांची आघाडी, ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेला ‘थर्ड फ्रंट’ थकल्या-भागलेल्यांची आघाडी असून तो अव्यावहारिक असल्याचे मत तृणमूल कॉँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीनंतर नवा ‘फेडरल फ्रंट’ अस्तित्वात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील दावेदारीबाबत लोकच काय ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया देत ममता यांनी पंतप्रधानपदाचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले. कॉँग्रेस आणि भाजपसोबत आघाडीची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
डाव्यांना लोकांनी नाकारले असल्याने त्यांना सोबत घेऊन स्थापन होणारी आघाडी व्यवहार्य नाही. त्यामुळे थर्ड फ्रंट थकलेल्यांची आघाडी असल्याचे ममता म्हणाल्या.


जदयू, डावे पक्ष, समाजवादी पक्ष यांच्यासह 11 पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या तिसर्‍या आघाडीबाबत प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. तिसर्‍या आघाडीत डाव्यांमुळे आपणास नाकारण्यात आले नसल्याचेही त्या म्हणाल्या. तृणमूलच्या सहभागातून निवडणूक निकालानंतरच फेडरल फ्रंट स्थापन होईल. या आघाडीचे सरकार अस्तित्वात येईल.


बंगालसह सात राज्यांत तृणमूल लढणार
तृणमूल कॉँग्रेस पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश, दिल्ली आणि झारखंडमध्ये निवडणूक लढणार आहे. मणिपूरमध्ये तृणमूल कॉँग्रेस विरोधी पक्ष आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये आमचे आमदार आहेत. त्यामुळे दिल्ली, झारखंडसह आणि अन्य काही राज्यांत निवडणूक लढणार असल्याचे याआधीच जाहीर केले आहे, असे ममता यांनी सांगितले.