नवी दिल्ली : 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करणा-या नराधमास पिडीत पित्याने घरी भोजनासाठी बोलावून त्याचा विचित्र पद्धतीने खून केल्याची घटना समोर आली आहे. उल्लेखनिय म्हणजे पिडित पित्याने स्वत:च पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. उत्तर-पूर्व दिल्लीतील खजुरी भागामध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी 14 वर्षीय मुलीवर मेडिकल सप्लायरने बलात्कार केला होता. या कृत्याबद्दल कुणाला सांगु नये, असे मुलीला धमकावले होते. परंतु मुलीने वडिलांना सर्व घटना सांगितली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. परंतु मुलीचा बलात्कारी खुलेपणाने फिरतो हे मुलीच्या पित्याच्या डोळ्यांत सलत होते. त्यांनी त्याला जीवे मारण्याचा कट रचला.
कटानुसार पिडित वडिलांनी त्या नराधमास घरी चर्चेसाठी आणि भोजनासाठी निमंत्रित केले. भोजनानंतर त्याला खुर्चीवर बांधून प्रायव्हेट पार्ट पेटवला आणि गळा आवळून जीवे मारले. पोलिसांनी पिडित मुलीच्या वडिलास खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.