आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दिल्‍लीतील 81 ट्रेन धावणार चालकाविना; जाणून घ्‍या वैशिष्‍ट्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालक विरहित गुगल कारच्‍या बातम्‍या आपण वाचल्‍या, ऐकल्‍या. पण, आता दिल्‍ली मेट्रोमध्‍ये चालक विरहित ट्रेन धावणार आहेत. बुधवारी डीएमआरसीच्‍या विशेष कार्यक्रमात पत्रकारांना एक ट्रेन दाखवण्‍यात आली. उत्‍तर कोरियामध्‍ये तिची निर्मिती झाली असून, जून 2015 मध्‍ये तिला भारतात आणले. मजलिस पार्क ते शिव विहार (लाइन सात) आणि जनकपुरी (पश्चिम) ते बॉटनिकल गार्डन (लाइन आठ) मार्गावर प्रायोगिक तत्‍त्‍वावर ती धावणार आहे.
डीएमआरसीच्‍या एका अधिकाऱ्याने सांगितले, सुरुवातीला या ट्रेनमध्‍ये एक चालक नियुक्‍त केला जाणार आहे. टप्‍प्‍याटप्‍प्‍याने या ट्रेनला चालक विरहित केले जाईल.
दिल्‍लीत धावणार अशा 81 ट्रेन
दिल्‍लीमध्‍ये अशा 81 ट्रेन धावणार आहेत. यातील प्रत्‍येक ट्रेनमध्‍ये 240 अतिरिक्‍त प्रवासी प्रवास करू शकतात. यामुळे 33 टक्‍के विजेची बचत होणार आहे.
ही आहे वैशिष्‍टये
- 33 टक्‍के वीज बजत
- 95 किमी प्रति तास वेग
- प्रत्‍येक कोचमध्‍ये 380 प्रवाशांच्‍या आसनाची व्‍यवस्‍था
- एका कोचमध्‍ये क्षमतेपेक्षा 40 प्रवासी अधिक बसू शकतात.
- ट्रेनमध्‍ये एकूण 2280 प्रवासी क्षमता.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ट्रेनचे फोटोज...