आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेल गेम: तरुण मुंबईतच देणार होता जीव, पण पावसामुळे गावी जाऊन केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या तरुणाने ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या केली. - Divya Marathi
या तरुणाने ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या केली.
अहमदाबाद - ब्ल्यू व्हेल गेममुळे आणखी एक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. येथे एका मुलाने शुक्रवारी साबरमती नदीत उडी मारून जीव दिला. त्याने 31 ऑगस्टला फेसबुकवर लाइव्ह ब्ल्यू व्हेल गेम खेळला होता. त्याने लास्ट स्टेज पार केली नव्हती. त्याने सुसाइड नोटमध्येही हा गेम खेळत असल्याचा उल्लेख केला आहे. तथापि, या केसला धरून आतापर्यंत भारतात या खतरनाक गेममुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कित्येकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे.
 
सुसाइड नोटमध्ये लिहिले- कंटाळलोय जीवनाला...
- आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अशोक मालुणा होते. तो बनासकांठा जिल्ह्याच्या पालनपूरमधील मालण गावाचा रहिवासी होता.
- त्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले की, मी माझ्या आई आणि बहिणीवर खूप प्रेम करतो. परंतु, या कंटाळवाण्या आयुष्याला मी त्रासून गेलो, म्हणूनच हा व्हिडिओ (फेसबुकवर ब्ल्यू व्हेल गेम लाइव्ह खेळण्याचा) बनवत आहे. यामागे कोणाचाच दोष नाही. माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. मी माझ्या आयुष्याला कंटाळलोय. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. परंतु मला आता जगायचे नाही, म्हणून आत्महत्या करत आहे.
 
आज लास्ट स्टेज आहे, म्हणून आत्महत्या करत आहे...
- त्याने सुसाइड नोटमध्ये पुढे लिहिले की, मी घरातून 46 हजार रुपये सोबत घेऊन मुंबईला गेलो होतो. पण तेथे खूप पाऊस झाल्याने परत अहमदाबादला आलो. येथेच आता आत्महत्या करणार आहे. बॅगेत जेवढे पैसे असतील ते माझ्या फॅमिलीला द्या. मी माझ्या फ्रेंडसह गेलो होतो, ती बॅग त्याच्याच जवळ आहे. आणि मोबाइलही त्याच्याकड आहे. मोबाइलमध्ये माझ्या घरचे नंबर आहेत, त्यांना कॉल करून सांगा की त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा या जगात नाहीये. यासाठीच मी ब्ल्यू व्हेल गेम डाऊनलोड केला होता आणि आज माझी लास्ट स्टेप आहे. मी सुसाइड करत आहे. कोणालाही चुकूनही मी दु:ख दिले असेल तर मला माफ करा. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...