आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिम्बाब्वेमध्ये प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड देणाऱ्या भारतीयाला RAPE च्या आरोपात अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना कृष्णा सत्यनारायण. - Divya Marathi
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना कृष्णा सत्यनारायण.
नवी दिल्ली/ हरारे - झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाशी संबंधीत एका व्यक्तीवर येथील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या व्यक्तीने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरीत केला होता. आरोपीचे नाव कृष्णा सत्यनारायण असून शुक्रवारी त्याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

कोण आहे कृष्णा
- कृष्णा सत्यनारायाण iTeamWorks मध्ये कन्सल्टंट आहे. त्याच्याकडे स्टेडियमच्या आतील बाजूने होर्डिंग्स लावण्याचे काम आहे.
- झिम्बाब्वे क्रिकेट दौऱ्यामध्ये कोण-कोण असेल याची यादी 11 जूनला जाहीर झाली होती. त्यात त्याला ITW Sports को-फाउंडर असल्याचे सांगितले होते.
- कृष्णासोबत रवी कृष्णनलाही अटक करण्यात आली आहे. तो झॉबिया येथील उद्योजक आहे.
- मंगळवारी दोघांनी येथील कोर्टात जामीन अर्ज दाखल केला.
- त्यांचे वकील ड्युमिसानी होमबिनी हायकोर्टातही अर्ज दाखल करणार आहेत. त्यावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
- झिम्बाब्वे पोलिसांनी दोघांच्या रिमांडसाठी अर्ज केला आहे.
- कृष्णा सत्यनारायण आणि रवि यांना शुक्रवारी बलात्काराच्या आरोपात मॅकल्स हॉटेलमधून अटक करण्यात आली होती.
(Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...