आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maneka Gandhi News In Marathi, No Gandhi Can Save The Congress Party

कॉंग्रेसला कोणताही गांधी वाचवू शकणार नाही, मनेका गांधी यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नेहरू-गांधी कुटुंबातील कोणताही व्यक्ती आता कॉंग्रेस पक्षाला वाचवू शकणार नाही. या पक्षाने केवळ स्वतःला उध्वस्त केले नाही तर देशाचेही अपरिमीत नुकसान केले आहे, असे भाजपच्या वरीष्ठ नेत्या मनेका गांधी यांनी सांगितले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनेका गांधी म्हणाल्या, की जनतेच्या अपेक्षांवर उतरण्यासाठी कॉंग्रेसला लवकरच पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय कॉंग्रेसचा निभाव लागणार नाही.
नुकत्याच झालेल्या निवडणुकींमध्ये कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यावर बोलताना मनेका गांधी म्हणाल्या, की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. या संख्येत वाढ होण्याची काही शक्यता दिसून येत नाही. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जरी घोषित केले तरी त्याचा पक्षाला काही लाभ होणार नाही. गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्याचा पक्षाकडून प्रयत्न केला जात आहे. तरीही त्याचा निवडणुकीत कोणताही लाभ झालेला नाही.
कॉंग्रेसने 500 काय आणि 5000 कोटी काय, कितीही रक्कम राहुल गांधी यांच्या इमेज बिल्डिंगवर खर्च केली तरी त्याचा पक्षाला काही फायदा होणार नाही, असेही मनेका म्हणाल्या.