आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलगायी हत्येवरून केंद्रीय मंत्र्यांत जुंपली, जावडेकर-मनेका वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि प्रकाश जावडेकर यांच्यात पशुहत्येवरून चांगलीच जुंपली. बिहारमध्ये २५० नीलगायी मारल्यावरून हा वाद पेटला. पिकांची नासाडी करणाऱ्या नीलगायींच्या हत्येची परवानगी पर्यावरण मंत्रालयाने दिल्याने मनेका प्रचंड संतापल्या. पर्यावरण मंत्रालय प्राण्यांचा जीव घेण्यासाठी आसुसले असल्याचे त्या म्हणाल्या. जावडेकरांकडे पर्यावरण व वन मंत्रालय आहे, तर महिला-बालकल्याण मंत्रालयाचा पदभार सांभाळणाऱ्या मनेका पशुहक्क चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. राज्यांकडून काही प्रस्ताव आले तर केंद्र अशा प्रकरणात परवानगी देत असते, असे स्पष्टीकरण जावडेकरांनी दिले आहे.
मेनका यांचा आरोप आहे की, 5 राज्यांमध्‍ये दिले जनावरांना मारण्‍याचे आदेश..
- मेनका गांधी म्‍हणाल्‍या, ''पर्यावरण मंत्रालयाने प्रत्‍येक राज्‍याला याबाबत पत्र लिहीले आहे.''
- ''बंगालमध्‍ये हत्‍तींना मारण्‍याचे सांगण्‍यात आले. हिमाचलयात त्‍यांनी सांगितले की, माकडांना मारा, गोव्‍यात सांगितले की, मोरांना मारा.''
- ''महाराष्ट्रातील चंद्रपूरात अलिकडेच 53 रानडुक्‍कर मारले आहेत. आणखी 50 मारण्‍याची परवानगी मिळाली आहे.
- पण वन विभागाने सांगितले की, आम्‍हाला या जनावरांना मारायचे नाही.
- मेनका या महिला व बाल विकास मंत्री आहेत. मात्र, त्‍या पशु हक्क कार्यकर्त्याही राहिल्‍या आहेत.
- बिहारच्‍या मोकामा मध्‍ये निलगायींना मारण्‍याचा आदेश मिळाल्‍यानंतर हे प्रकरण आणखीच तापले आहे.
- मेनका गांधी यांनी सांगितले की, बिहारमध्‍ये पहिल्‍यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांना मारण्‍यात आले आहे.
- येथे कोणी या कामासाठी तयार झाले नाही, तर बाहेरुन लोकांना बोलावण्‍यात आले.
का झाला हा वाद सुरू..
- मोकामामध्‍ये हैदराबादहून आलेल्‍या शूटर्सनी मागील 3 दिवसात 200 हून अधिक निलगायी मारल्‍या.
- दोन हजारहून अधिक निलगायींना जंगली भागातून पळवण्‍यात आले आहे.
- हैदराबादचे शूटर नवाब शफाथ अली खान आणि त्‍यांचे सहकारी मागील 4 दिवसांपासून या मोहिमेसाठी काम करत आहेत.
- मोकामामध्‍ये 10 हजारहून अधिक निलगायी आहेत. या निलगायी दरवर्षी लाखो रुपयांच्‍या पिकाची नासाडी करतात.
मेनका यांच्‍या आरोपांना जावडेकरांचे उत्‍तर..
- मेनका यांनी आरोप केल्‍यानंतर प्रकाश जावडेकर म्‍हणाले, '' या जनावरांमुळे पिकांची नासाडी होत असल्‍याचे राज्‍य सरकारने आम्‍हाला पत्र लिहून कळवल्‍यानंतर आम्‍ही त्‍यांना ही परवानगी दिली आहे.''
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...