आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात लगेज नेणाराच करत होता चोरी, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आता जेव्हाही विमानाने प्रवास कराल त्यावेळी तुम्हाला तुमचे सामार व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घ्यावी लागेल. अनेकदा विमानातील बॅगमधले सामान चोरीला गेल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. त्यात आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विमान कंपन्यांचे कर्मचारीच व्हीव्हीआयपींच्या सामानाची चोरी करत असल्याची दाट शंका निर्माण झाली आहे. 

काय आहे व्हिडिओमध्ये.. 
मुख्यमंत्र्यांनी शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक एअरपोर्ट कर्मचारी प्रवाशांच्या सामानाशी छेडछाड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण प्रवाशांच्या बॅगेच्या चैन खोलून त्यातून काहीतरी सामान काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एकापाठोपाठ एक सर्व बॅगबरोबर त्याने हा प्रकार केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि व्हिडीओ..
बातम्या आणखी आहेत...