आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरच्या तरुणीला विमानतळावर विचारले, \'खरचं भारतीय आहे? वाटत तर नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मणिपूरच्या एका महिलेने आरोप केला आहे, की इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमीग्रेशन चेक दरम्यान तिला वंशभेदाच्या कॉमेंट्सचा सामना करावा लागला. तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना तिने फेसबुकवर पोस्ट केली असून ती आता व्हायरल होत आहे. त्याची दखल घेत सुषमा स्वराज यांनी मोनिका खांगेमबम नावाच्या या महिले माफी मागितली आहे. त्यांनी ट्विट करुन या प्रकरणात राजनाथसिंह दखल देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

मोनिकाने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिले
> ही घटना शनिवार रात्रीची आहे. मोनिया साऊथ कोरियाची राजधानी सेऊलला जात होती.
> मोनिकाने लिहिले आहे, की इमिग्रेशन डेस्कच्या अधिकाऱ्यांनी तिचा पासपोर्ट पाहिला आणि म्हणाले, 'इंडियन तर वाटत नाही'
> तिच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. ती भारताच्या पूर्वोत्तर राज्यातील रहिवासी असूनही तिला तू खरचं भारतीय आहेस का ? याची वारंवार विचारणा झाली.
> त्यासाठी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. जसे, भारतात किती राज्य आहे.
> तिने सांगितले मी मणिपूरची रहिवासी आहे, तर विचारले की सांग मणिपूरला किती देशांच्या सीमा आहेत.
> अधिकारी हे प्रश्न विचारत होते तेव्हा इतर प्रवाशी तिच्याकडे पाहून हसत होते. भारतीय नागरिकाचा स्वतःच्याच देशात त्याच्या रंग-रुपावरुन अपमान होणे योग्य नाही, असे मोनिकाचे म्हणणे आहे.

व्हायरल झाली पोस्ट
> मोनिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
> आतापर्यंत या पोस्टला दीड हजार लोकांनी लाइक केले असून 669 लोकांनी शेअर केले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...