आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनीष सिसोदियांनी पाहिले \'रामायण\', सरकारी हॉस्पिटलचा कर्मचारी निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉस्पिटलचा कर्मचारी कामाच्यावेळेत सरकारी कॉम्प्यूटरवर सीरियल पाहाण्यात मग्न. मागे दिल्लीचे उपमुख्यमंत्री उभे. - Divya Marathi
हॉस्पिटलचा कर्मचारी कामाच्यावेळेत सरकारी कॉम्प्यूटरवर सीरियल पाहाण्यात मग्न. मागे दिल्लीचे उपमुख्यमंत्री उभे.
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी कॉम्प्यूटरवर रामायण सीरियल पाहाताना पकडलेल्या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. सिसोदियांनी कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आणि जागेवरच निलंबनाचे आदेश दिले. सिसोदियांनी सरकारी हॉस्पिटलचा अचानक दौरा केला तेव्हा हा कर्मचारी सापडला होता.

कर्मचारी सीरियल पाहात असल्याचे व्हिडिओ शुटिंग
- मनीष सिसोदिया हॉस्पिटलच्या पाहाणीसाठी गेले तेव्हा व्हिडिओ शुटिंग सुरु होती.
- उपमुख्यमंत्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे मोठ्या संख्येने पेशंट्स होते.
- सिसोदिया हॉस्पिटलच्या एका रुममध्ये गेले तेव्हा एक कर्मचारी ड्यूटी टायमिंगमध्ये कॉम्प्यूटरवर रामायण सीरियल पाहात होता.
- सिसोदियांनी हे दृष्य पाहिले तेव्हा ते नाराज झाले आणि त्यांनी कर्मचाऱ्याची खरडपट्टी काढली.
- उपमुख्यमंत्री सिसोदियांसोबत यावेळी दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन देखील होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उपमुख्यमंत्री सिसोदियांनी कसा पकडला कर्मचारी..
बातम्या आणखी आहेत...