आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला आयोग भरती प्रकरण, आता शिसोदियांवर ठपका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष शिसोदियादेखील भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाच्या (एसीबी) निशाण्यावर आहेत. एसीबीप्रमुख मुकेशकुमार यांनी शिसोदिया यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले आहे.

मनीष शिसोदिया यांना दिल्ली महिला आयोगामध्ये झालेल्या ८५ जणांच्या भरती प्रकरणात समन्स जारी करण्यात आले आहे. मुकेशकुमार १४ ऑक्टोबरला शिसोदिया यांची चौकशी करणार आहेत. एसीबीने अगोदर महिला अायोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचीही चौकशी केली आहे. दिल्ली महिला आयोगामध्ये नियमांचा भंग करून ८५ जणांची भरती करण्यात आली आहे. या प्रकरणातील एफआयआरमध्ये केजरीवाल यांचेही नाव आहे. एफआयआरमध्ये नाव आल्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांच्या सहमतीशिवाय एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाऊ शकत नाही. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून एसीबीप्रमुखांनी केजरीवाल यांच्याविरोधात काहीही पुरावे सापडले नसून ते आरोपी नसल्याचे स्पष्ट केले होते.

दिल्लीतील ७२ टक्के आमदार नापास
दिल्लीतील ७२ टक्के आमदार सामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्या अर्थाने ते नापास झाले आहे, अशी भावना दिल्लीकरांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ दरम्यान एनजीआे प्रजा फाउंडेशनने केलेल्या एका पाहणीत हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तीन आमदारांनी तर एकही मुद्दा उपस्थित केला नाही. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत २० आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. दहा जणांच्या विरोधात निवडणुकीनंतर गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु अहवालात सर्वोत्तम कामगिरीबद्दल एस. के. बग्गा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सही राम नीचांकी कामगिरी करणारे आमदार ठरले. अमानतुल्ला खान सर्वांना उपलब्ध होणारे आमदार ठरले. त्यांना ‘मिस्टर पॉप्युलर’ असा किताब देण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...