आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Sisodiya Will Be Deputy Cm Of Delhi 6 Mlas Will Take Oath With Arvind Kejriwal

मोदी-केजरीवालांची \'चाय पे\' चर्चा; केजरींच्या शपथविधीला उपस्थित राहाणार नाहीत पंतप्रधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवारी) 'चाय पे' चर्चा झाली. पंतप्रधानांचे निवासस्थान 7, रेसकोर्स रोडवर सकाळी साडे दहा वाजता केजरीवाल यांनी मोदींची पहिली औपचारिक भेट घेतली. सुरुवातीला हात जोडून नंतर हस्तांदोलन करून मोदींनी केजरीवाल यांचे स्वागत केले. यावेळी 'आप' मनीष सिसोदिया उपस्थित होते. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदींकडे केली.

केजरीवाल आणि नरेंद्र मोदींमध्ये 14 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी हसत-हसत चर्चा केली. हस्तांदोलन करून नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांचे स्वागत केले. परंतु, गळाभेट घेतली नाही. दरम्यान, केजरीवालांनी बुधवारी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी केजरीवालांची गळाभेट घेतली होती.
तसेच केजरीवाल यांनी मोदींना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले. मोदींनी ते निमत्रंण स्विकारले. मात्र, मोदी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान मोदी 14 फेब्रुवारीला महाराष्‍ट्रातील बारामतीचा दौरा करणार आहे. मोदींचा हा दौरा पूर्वनियोजित आहे. बारामती येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मोदी एकाच मंचावर 'साथ-साथ' दिसणार आहे.

दरम्यान, 'आप'च्या यशानंतर नरेंद्र मोदींनी केजरीवालांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी केजरीवाल यांनी मोदींची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि केजरीवाल वाराणसीत प्रत्यक्ष आमने-सामने आले होते. त्यानंतर दिल्ली विधानसभेत मोदी-केजरीवालांमध्ये पुन्हा एकदा लढत झाली.
मनीष सिसोदिया होणार दिल्लीचे उपमुख्यमंत्री....
आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री होणार आहे. 'आप'च्या कोर ग्रुपने याबाबत निर्णय घेतला आहे. मनीष सिसोदिया हे पपडगंजचे आमदार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह छह मंत्र्यांची यादी आग (गुरुवारी) उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांच्या कॅमिनेटमध्ये मनिष सिसोदियांसह कपिल मिश्रा, सतेंद्र जैन, संदीप कुमार, जितेंद्र तोमर, इमरान हसन यांचा समावेश असल्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पाहा, दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिग्गजांची भेट