आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Tiwari Not Fight Lok Sabha Elections 2014

काँग्रेस नेते मनीष तिवारी लोकसभा लढविणार नाही, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यंदा लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, तिवारींनी पक्षातील वरिष्ठांना त्यांच्या निर्णयाची माहिती दिली आहे. ते राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिवारी ह्र्दयविकाराने ग्रस्त आहेत. शनिवारीच त्यांना दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याआधी एम्समध्येही त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.
लुधियानाचे खासदार असलेले मनीष तिवारी हे काँग्रेसमधील आघाडीचे नेते आहेत. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण, पक्षातील अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीकडे पाठ फरविली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, का लढणार नाहीत तिवारी