आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manishankar Ayyar Commented On PM Narendra Modi, Controversy In BJP And Congress

मोदींना हटवले तरच संबंधांमध्ये सुधारणा, मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील गटचर्चेत केलेल्या टिप्पणीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान पुन्हा बोलणी सुरू करायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवावे लागेल, असे अय्यर म्हणाले. अय्यर यांच्या विधानावरून राजकारण चांगलेच पेटले असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी या मुद्द्यावर नेमका काय विचार करतात, अशी विचारणा भाजपने केली आहे. तर किंडरगार्टनचे मूलही असेे विधान करणार नाही, अशी प्रतिक्रिया राजदने व्यक्त केली आहे.

असे घडले प्रकरण
‘दुनिया’ या पाक वृत्तवाहिनीवरील चर्चेत ‘उभय देशांतील संबंधांतील कडवटपणा दूर करण्यासाठी काय करावे लागेल?’ असे निवेदकाने अय्यर यांना विचारले होते. त्यावर अय्यर म्हणाले,‘पहिली व सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे मोदींना हटवा. चार वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. मोदी असले तरी बोलणी पुढे जाऊ शकते याबाबत ते (इतर पॅनलिस्ट) आशावादी आहेत. परंतु मला तसे वाटत नाही. आम्हाला (काँग्रेस) सत्तेत परत आणा (संबंध सुधारण्यासाठी) अन्य कोणताही मार्ग नाही. आम्ही त्यांना हटवू परंतु तोपर्यंत (पाकला) प्रतीक्षा करावी लागेल.’ असे अय्यर म्हणाले.

त्यांना मुंबई हल्ल्याचे कौतुक : हेपतुल्ला
देशातील १२५ कोटी जनतेचा विश्वास गमावला आहे, याची काँग्रेसला खात्री पटली आहे. त्यामुळेच शेजाऱ्यांकडे भीक मागण्यात येत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्लांनी केली. वाजपेयी हे बसमध्ये बसून पाकिस्तानला जाणारे पहिले पंतप्रधान होते, याचा अय्यर यांना विसर पडलेला दिसतो. त्यांनी दिलेल्या ‘दोस्ती का पैगाम’च्या बदल्यात कारगिल युद्ध झेलावे लागले. अय्यर भारतावरील हल्ल्याचे कौतुक करू लागले आहेत. काही दिवसांनंतर ते मुंबई हल्ल्याचेही कौतुक करतील, याची मला खात्री आहे, असे त्या म्हणाल्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया...