आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपाध्यक्ष अमित शहांच्या भेटीनंतर मांझींची एनडीए कडून निवडणुकीची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची नौका अखेर एनडीएच्या किनाऱ्यावर लागली. मांझी यांनी गुरूवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. रालोआसोबत असल्यामुळे आम्ही आता लालू-नीतिश कुमार यांच्या आघाडीला रोखण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास मांझी यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे मांझी यांना स्वत:ला एका सारथीची गरज आहे, असा टोला जदयूचे नेते के.सी. त्यागी यांनी लगावला.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या सर्व घटक पक्षांमध्ये जागा वाटपावर सहमती व्हावी म्हणून शहा यांनी अंतिम निर्णयासाठी जीतनराम मांझी यांना दिल्लीला बोलावले होते, असे सूत्रांना वाटते. उभय नेत्यांमध्ये २० जून रोजी भेट होणार होती. तशी वेळ मांझी यांनी मागून घेतली होती. परंतु नंतर बैठक लवकर घेण्यात आली. एनडीएच्या छत्रीखाली मांझी यांना राज्यात ५० जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची इच्छा आहे. तशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजद नेते लालूप्रसाद यादव यांच्या पक्षातील आघाडी रालोआसाठी राज्यातील वाट िबकट करणारी ठरू शकते, अशी कबुली केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी गुरुवारी दिली. त्यामुळेच आघाडीसंबंधीचे वास्तव आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांची भेट घेतली, असे कुशवाह यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष कुशवाह यांच्यासोबत शहा यांनी गुरुवारी चर्चा केली. लोकसमता पार्टी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा रालोआतील घटकपक्ष आहे. बदलती समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही पक्ष लालू-नितीश आघाडीचा मुकाबला करण्यासाठी व्यूहरचना आखणार आहेत. नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भाजपच्या यशाचा रथ रोखण्यात दोघे यशस्वी ठरू शकतात, असा निरीक्षकांना वाटते. बिहारमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये, लालूप्रसाद यादव यांनी साजरा केला 68 वा वाढदिवस
बातम्या आणखी आहेत...