आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjit Sen Write Letter To Manmohan Singh But Answer Sending Modi

बहिणींच्या लग्नासाठी मनमोहन यांना पत्र, उत्तर आले मोदींकडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / बुलंदशहर - बुलंदशहर जिल्ह्यातील मंजित सेन यांनी जानेवारी २०१४ मध्ये दोन बहिणींच्या लग्नासाठी पंतप्रधानांना पत्र पाठवले होते. त्या वेळी मनमोहनसिंग हे पंतप्रधान होते. त्यांच्या काळात पत्राला काही उत्तर आले नाही. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलंदशहरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सेन परिवाराची माहिती मागवली आहे.

जिल्हा प्रशासनाने ही माहिती संकलित करून ती पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली जाणार असल्याचे सांगितले.
मंजित(२५) यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून बहिणींच्या विवाहासाठी ३.६४ लाख रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले. परंतु कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने हा खर्च पेलणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले होते. पत्रासोबत विवाहाच्या खर्चाचा तपशील यादीत नमूद करून पाठवला होता. मंजित यांनी सांगितले की, दुसरा कोणता पर्याय नव्हता म्हणून पंतप्रधानांना पत्र पाठवले. मला नोकरी मिळवून द्यावी अथवा आर्थिक मदत मिळावी. त्यातून मी बहिणींचा विवाह करू शकेन, असे मी म्हटले होते. मंजित खासगी शाळेत शिक्षक असून त्यांना २,२०० रुपये वेतन आहे. वडील सुखलालसिंह नोएडात एका खासगी फर्ममध्ये काम करतात. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली आहे. मंजित यांना तीन बहिणी आहेत. मोहिनी व तनू अनुक्रमे आठवीपर्यंत शिकल्या आहेत, तर छोटी पुष्पा ११ वीत शिकते आहे.