आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांचा मुलायम सिंहांवर अविश्‍वास, सरकार कार्यकाळ पूर्ण करण्‍याचाही विश्‍वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधानांसोबत विशेष विमानातून- पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा समाजवादी पार्टीवर विश्‍वास नाही. सपाचे अध्‍यक्ष मुलायम सिंह यादव कोणत्‍याही क्षणी सरकारचा पाठिंबा काढू शकतात, असे पंतप्रधानांना वाटते. मात्र, त्‍यामुळे सरकार पडणार नाही. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वासही पंतप्रधानांनी व्‍यक्त केला. 'ब्रिक्‍स' राष्‍ट्रांची परिषद आटोपल्‍यानंतर पंतप्रधान गुरुवारी रात्री देशात परतले. त्‍यावेळी विशेष विमानात त्‍यांच्‍यासोबत पत्रकारांशी त्‍यांनी चर्चा केली. अनेक मुद्यांवर त्‍यांनी ठामपणे उत्तरे दिली.

पंतप्रधानांनी सांगितले की, मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता नाही. समाजवादी पार्टी पाठिंबा काढू शकते. परंतु, सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. द्रमुकसोबत संबंध विच्‍छेद केल्‍यासंदर्भात पंतप्रधान म्‍हणाले, आघाडीच्‍या काही अपरिहार्यता असतात. परंतु, त्‍यांच्‍या अटीवरुन देशाचा विकास रोखता येत नाही. तसेच देशाची परराष्‍ट्र धोरणेही बदलत नाहीत.

या चर्चेमध्‍ये मनमोहन सिंग यांनी स्‍वतःच्‍या पंतप्रधानपदाच्‍या तिस-या कार्यकाळाचा मुद्दा टाळला. आगामी लोकसभा निवडणुकीतही त्‍यांना नेता म्‍हणून स्विकारण्‍यात आले तर ते पंतप्रधान होतील का? असा प्रश्‍न त्‍यांना विचारण्‍यात आला. त्‍यावर त्‍यांनी वेळप्रसंगी निर्णय होईल, असे सांगून उत्तर टाळले.