आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहनसिंगांसाठी नव्या घराचा शोध,काँग्रेसला सत्ता मिळो अथवा न मिळो पंतप्रधान शर्यतीतून बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधानाच्या रूपात हे माझे शेवटचे सत्र असून यानंतर मी या पदाचा उमेदवार नसेल, असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली तरी मनमोहनसिंग यांच्याऐवजी अन्य कोणी या पदावर विराजमान होईल हे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने निवडणुकीनंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासाठी नव्या निवासस्थानाचा शोध सुरू केला आहे. यासाठी दिल्लीतील लुटियन बंगला भागातील पाच घरांकडे पंतप्रधानांचे संभाव्य निवासस्थान म्हणून पाहिले जात आहे; परंतु याचा अंतिम निर्णय मनमोहनसिंग यांच्या पसंतीवरच अवलंबून आहे. पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना सरकारतर्फे निवासस्थान दिल्या जात असते.
मनमोहनसिंग यांना राहण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाकडून सध्या पाच बंगल्याची चाचपणी सुरू आहे. यामध्ये 9 जनपथ, 5 जनपथ, 3 मोतीलाल नेहरू मार्ग, 19 सफदरजंग रोड आणि 22 अकबर रोड येथील बंगल्यांचा समावेश आहे. यापैकी चार बंगले सोनिया गांधी यांचे निवासस्थान आणि काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोडपासून जवळच आहेत. 19 सफदरजंग रोडवरील बंगल्यात मनमोहनसिंग स्वत: 2004 पर्यंत राहत होते. 9 जनपथ हा बंगला सुरक्षेच्या कारणांमुळे मागील कित्येक वर्षांपासून रिकामाच ठेवण्यात आला आहे. कारण त्याला लागून असलेल्या 10 जनपथ बंगल्यात संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी यांचा निवास आहे.