आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात गोंधळ, आवाज उठविणा-याची मुस्कटदाबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या भाषणाला एका व्यक्तिने विरोध केला. वक्फ बोर्डाच्या या कार्यक्रमात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी देखील मंचावर उपस्थित होत्या.
पंतप्रधानांनी अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी नवी योजना तयार केली जात असल्याची माहिती दिली. त्यांच्या भाषणाची सांगता झाल्यानंतर डॉ. फहीम बेग नावाच्या व्यक्तिने उठून त्यांच्या भाषणाला विरोध केला. डॉ. बेग यांचे म्हणणे होते, ज्या योजना आहेत त्यांची योग्यरित्या अमंलबजावणी झाली तर नव्या योजना तयार करण्याची गरज देखील भासणार नाही. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अडथळा आणणा-या त्या डॉ. बेग यांचा आरोप आहे, की अल्पसंख्यांकाचा विकास झालेला नाही. डॉ. बेग यांच्या आरोपानंतर त्यांना तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पुढे बोलू दिले नाही. त्यांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना सभागृहाबाहेर काढले. तेव्हा उपस्थितांनी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत सुरक्षा रक्षकांच्या कारवाईचा विरोध केला.

पुढील स्लाइडमध्ये, पंतप्रधान ऐकणार डॉ. बेग यांच्या समस्या