आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहनसिंगांना तिस-यांदा पंतप्रधानपद नको, राहुल गांधींना मार्गदर्शन करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पंतप्रधानपदाच्‍या तिस-या टर्मसाठी मनमोहनसिंग दावेदार आहेत का, या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले आहे. त्‍यांनी तिस-या टर्मसाठी इच्‍छुक नसल्‍याचे कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांना कळविले आहे. कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांना मार्गदर्शन करण्‍यास इच्‍छुक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, पंतप्रधानांना आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विश्रांती हवी आहे. काही काळ सुटी घेऊन ते पक्षासाठी काम करण्‍यास इच्‍छुक आहेत. तसेच राहुल गांधी यांना मार्गदर्शन करण्‍याची इच्‍छाही त्‍यांनी व्‍यक्त केली आहे. ही माहिती कॉंग्रेसच्‍या दोन वरिष्‍ठ नेत्‍यांनी दिली आहे. नाव गुप्‍त ठेवण्‍याच्‍या अटीवर ही माहिती त्‍यांनी दिली. ते पक्षात कोणत्‍या जबाबदारीने पक्षाचे काम आणि राहुल गांधींना मार्गदर्शन करतील, हे आताच सांगणे अवघड आहे, असे या नेत्‍यांनी सांगितले.

राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणून घोषित करण्‍याचे संकेत... वाचा पुढे...