आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांच्‍या एका वक्तव्‍यामुळे कॉंग्रेसच्‍या अडचणी वाढल्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- शांत स्‍वभावासाठी परिचित आणि नेहमी गप्‍प राहतात अशी विरोधकांची टीका ओढावून घेणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍या एका वक्तव्‍यामुळे कॉंग्रेसमध्‍ये भूकंप आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही आपण पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीत असल्‍याचे संकेत त्‍यांनी एका वक्तव्‍यातून दिले. त्‍यानंतर कॉंग्रेसला स्‍पष्‍टीकरण द्यावे लागले की, लोकसभेत निवडून जाणारे सदस्‍यच पंतप्रधानांची निवड करतील.

दक्षिण आफ्रिका दौ-यावरुन परतताना विशेष विमानात पत्रकारांसोबत चर्चा करताना मनमोहन सिंग यांना पत्रकारांनी पंतप्रधानपदाबाबत विचारले. त्‍यावेळी ते म्‍हणाले होते, जेव्‍हा ही वेळ येईल तेव्‍हाच निर्णय होईल.

पंतप्रधानांच्‍या वक्तव्‍यामुळे कॉंग्रेसचे नेते नाराज झाले. संपूर्ण कॉंग्रेसमध्‍ये राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्‍यासाठी मोहिम सुरु असताना मनमोहन सिंग यांचे वक्तव्‍य सर्वांनाच अडचणीत आणणारे ठरले.