आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmohan Singh Surrendered To Sonia Gandhi News In Marathi

मनमोहनसिंग सोनिया गांधींनी शरण गेले होते, PMO च्या माजी मीडिया सल्लागारांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान मनमोहनसिंग कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) घटक पक्षांना शरण गेले होते, असा दावा पंतप्रधान कार्यालयातील माजी मीडिया सल्लागार आणि वरिष्ठ संपादक संजया बारू यांनी केला आहे. संपुआ-2 सत्तेत असताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आणि पंतप्रधान कार्यालयातील प्रमुख बैठका सोनियांच्या आदेशावरून बोलविल्या जात होत्या, असेही त्यांनी सांगितले आहे.
मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्यामधील बचावाचे संबंध आणि मनमोहनसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये असलेले तणावाचे संबंध यावर संजया बारू यांनी त्यांच्या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. बारू यांनी लिहिले आहे, की सत्तेचे दोन केंद्र नसावेत असे मला पंतप्रधानांनी सांगितले होते. यामुळे संभ्रमावस्था निर्माण होते. कॉंग्रेस अध्यक्षा सत्तेच्या केंद्रस्थानी होत्या, हे मला स्वीकारावे लागले. यावेळी केंद्र सरकारचे उत्तरदायित्व कॉंग्रेस पक्षाला होते.
2009 मध्ये संपुआ-2 सत्तेत आल्यानंतर मनमोहनसिंग यांच्या विचारांमध्ये अमुलाग्र बदल झाला. माझे काम आणि नशिबामुळे मी पंतप्रधान झालो, असा समज मनमोहनसिंग यांचा झाला होता. याचे श्रेय सोनिया गांधी यांना नाही, असेही त्यांना वाटत होते. अशा स्वरुपाचे विचार दिवसागणिक अधिक गडद होत होते. मी एकट्याने निर्णय घेत मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांच्या समावेश करू शकतो, असेही त्यांचा भ्रम झाला होता. भ्रमाचा हा भोपळा फोडण्यासाठी सोनिया गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्रालय पंतप्रधानांशी सल्लामसलत न करता प्रणव मुखर्जी यांना सोपविले होते.
1991-92 च्या आर्थिक घडामोडींमध्ये मनमोहनसिंग यांचे सी. रंगराजन प्रधान आर्थिक सल्लागार होते. त्यांना देशाचा अर्थमंत्री करण्याच्या विचारात सिंग होते, असाही दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
टूजी गैरव्यवहार प्रकाशात येण्यापूर्वी ए. राजा यांना मंत्रिमंडळात न घेण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला होता. परंतु, शेवटी त्यांना कॉंग्रेस आणि द्रमुकच्या दबावापुढे झुकावे लागले होते, असेही सांगण्यात आले आहे.