आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घोटाळ्यातील एका प्रकरणात मनमोहनसिंग निर्दोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरोधात पुरावे उपलब्ध नसल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात म्हटले आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोन जणांविरोधात आरोपीच्या रूपात समन्स पाठवले जावे, अशी मागणी केली होती. मात्र, सीबीआयने यास विरोध केला आहे. प्रकरणाच्या कारवाईत विलंब करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, जिंदाल समूहाच्या कंपन्यांना कोळसा खाणी वाटप करण्याच्या प्रकरणात मनमोहनसिंग सामील असल्याचे कोणतेही पुरावे प्रथमदर्शी दिसून येत नाहीत.
सीबीआयने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असून तत्कालीन पंतप्रधानांना आरोपीच्या रूपात समन्स बजावण्याचे कारण नाही. वकील आर. एस. चिमा यांच्या या युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल १६ ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवला आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर आणि गगन स्पंज आयर्न कंपनीला झारखंडमधील अमरकोंडा-मुर्गादंगल कोळसा खाण वितरित करण्यात आली होती.