आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmohan Singh Today Go On American Tour, Bramhos Agreement Posibility

मनमोहन सिंग आज होणार अमेरिकेच्या दौ-यावर रवाना, ‘ब्राह्मोस’ सारखा कराराची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान मनमोहन सिंग उद्या बुधवारी अमेरिकेच्या दौ-यावर रवाना होत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ते हजेरी लावणार आहेत. दौ-यादरम्यान सिंग राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सोबतही चर्चा करतील. दरम्यान, रशियासोबतच्या ब्राह्मोस करारा प्रमाणेच अमेरिकेसोबतही करार होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान सिंग व ओबामा यांच्यात 27 सप्टेंबर रोजी बैठक होईल. बैठकीत द्विपक्षीय मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा होईल, असे सांगण्यात आले. अफगाणिस्तानातून अमेरिकेने नाटोचे सैन्य माघारी घेतले आहे. त्या शिवाय सिरियातील हिंसाचार या आंतरराष्ट्रीय प्रश्नावरही दोन्ही नेते आपल्या भूमिका मांडतील. संरक्षण विभागाने या बैठकीला अधिक महत्त्व दिले आहे.


रशियासोबत भारताने ब्राह्मोस क्षेपणास्राची निर्मिती केली. त्या सारखा करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे अमेरिकेकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. सिंग यांचा हा आठवड्याभराचा दौरा आहे. ते सुरुवातीला वॉशिंग्टनला जातील. तेथून ते न्यूयॉर्कला जाणार आहेत. तेथे संयुक्त राष्ट्राची शिखर बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही भेटतील.


नेमके कोणते मुद्द्यावर भर?
अण्वस्र व संरक्षण क्षेत्रातील सहकार्यावर दोन्ही नेते भर देतील. डिझाईन, विकास व निर्मितीच्या पातळीवर दोन्ही देशांत विचारविनिमय होईल. त्याचबरोबर अणुऊर्जा महामंडळ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) व अमेरिकी फर्म वेस्टिंग्टनहाऊस यांच्यातील करारावर सहमती होण्याची शक्यता आहे. आर्थिक मुद्दे देखील उभय नेत्यांच्या बैठकीच्या अजेंड्यावर आहे.